Headlines

‘अभिनय इथेच वारला’; The Archies मधल्या अगस्त्य नंदा-खुशी कपूरला रवीना टंडनने केले ट्रोल

[ad_1]

The Archies : नुकताच ‘द आर्चीज’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील काही सीन्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काहींना हा चित्रपट आवडला तर काहींनी या चित्रपटावर आणि त्यातील स्टार किड्सवर टिका केली आहे. सोशल मीडियावर सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांच्या अभिनयावरुन त्यांना ट्रोल केले जात आहे. त्यांच्या अभिनयावरुन काही मीम्स देखील व्हायरल होत आहेत. अशाच एका मीम्सवर बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री रवीना टंडन हिनं प्रतिक्रिया दिली आहे. रविनाने दिलेल्या या प्रतिक्रियेची सोशल मीडियावर चर्चा होतेय.

‘द आर्चीज’ हा चित्रपट 7 डिसेंबर 2023 रोजी रिलीज झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीपासूनच चर्चेत होता. त्यामागचं कारण म्हणजे या चित्रपटात काम करणारी बॉलिवूडच्या दिग्ग्ज कलाकांरांची मुलं. हा चित्रपट झोया अख्तरने दिग्दर्शित केला आहे. तुम्हाला या चित्रपटात मुख्य भूमिकेत शाहरूख खानची मुलगी सुहाना खान, श्रीदेवीची मुलगी व जान्हवी कपूरची बहिण खुशी कपूर व अमिताभ बच्चनचा नातू अगस्त्य नंदा दिसतील. या तिघांनी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान बॉलिवूड जगातील मोठ मोठ्या कलाकांरानी हजेरी लावून या चित्रपटासाठी असलेली उत्सुकता जाहीर केली होती. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काहींना या चित्रपटात काम करणाऱ्या स्टार किड्सचा अभिनय आवडला नाही. म्हणूनच त्यांच्या अभिनयाचे व्हिडिओ क्लिप्स व स्क्रिन शॉट समाज माध्यमांवर व्हायरल केले जात आहेत. 

इतकंच नव्हे तर काही नेटकऱ्यांनी चित्रपटातील एका सीनचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यामध्ये खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा आहेत. अनेकजन या पोस्टवर विविध प्रतिक्रिया देत आहेत अशातच एका यूजरने, “अभिनय इथेच मरण पावला.” असं म्हटलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयाने बॉलिवुड गाजवणारी अभिनेत्री रवीना टंडनने ही पोस्ट लाईक केली आहे. रविनाने ती पोस्ट लाईक केल्याचा स्क्रीनशॉट एका Reddit युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर त्यांने, रविनाला देखील हा मीम आवडला आहे,’ असं म्हटलं आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. 

The Archies

काय आहे ‘द आर्चीज’?

‘द आर्चीज’ या चित्रपटाची कथा एका कॉमिक बुकवर आधारित आहे. ही कथा सात शाळकरी मुलांवर आधारित असून ती मुलं त्यांच्या शहरातील उद्यान वाचवण्यासाठी एका मोठ्या उद्योजकाशी संघर्ष करताना दाखवली आहेत. या चित्रपटात अगस्त्य,  खुशी आणि सुहाना या मुलांमध्ये लव्ह ट्रॅगंल दाखवला आहे. सोबतच, या चित्रपटात वेदांग रैना, आदिती सेहगल , मिहिर आहुजा आणि युवराज मेंडा देखील मुख्य भूमिकेत आहेत. वेदांग रैनाच्या अभिनयाचे अनेक प्लॅटफॉमवर कौतुक देखील केलं जात आहे.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *