Headlines

‘आता कोण भेटली…’, Manasi Naik चा पती प्रदीप खरेरा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

[ad_1]

Manasi Naik Husband Pradeep Kharera Got Troll Over New Video : मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) ही तिच्या उत्तम नृत्यशैलीसाठी ओळखली जाते. मानसीचं ‘बघतोय रिक्षावाला’ (Baghtoy Rikshawala), ‘बाई वाड्यावर’ ही गाणी चांगलीच लोकप्रिय झाली होती. खरंतर या गाण्यांमुळे मानसीला घराघरात ओळख मिळाली. काही दिवसांपूर्वी मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा (Pradeep Kharera) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अभिनेत्रीनं दुजोरा दिला होता. इतकंच काय तर त्यानं पैसा आणि प्रसिद्धी मिळावी म्हणून तिच्याशी लग्न केलं होतं. दरम्यान, आता प्रदीप खरेरानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. 

प्रदीपनं त्याच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो त्याच्या घरी असल्याचे दिसत आहे. त्याच्या हातात कॉफी मघ आहे. दरम्यान, या व्हिडीओत तो ‘तुमको प्यार करते है. जुर्म सिर्फ इतना है, तुमको प्यार करते है’ या गाण्यावर लिप्सिंग करताना दिसत आहे. त्यावरून प्रदीपला नेटकऱ्यांना ट्रोल केलं आहे. एक नेटकरी त्याला ट्रोल करत म्हणाला, ‘आता तुला कोण भेटली.’

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रदीपनं रडतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्याचा हा व्हिडीओ पाहून मानसीनं एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली होती. प्रदीपच्या त्या व्हिडीओवर मानसी म्हणाली की, ‘अरे कच्ची कलियां मिल गई एक नहीं बल्की दो दो…और रोने के अॅक्टिंग के ५० रुपये काटे जाए… बंदा पार्टी करता है और रील में रोता है…#FakeLove, सहानुभूती, मै ही दे देती फुकट में, जैसे खाया यूज किया फुकट में #KarmaWillTalk.’, असे मानसी पोस्टमध्ये म्हटली आहे. 

हेही वाचा : दिपीकाच्या भगव्या बिकीनीनंतर Shahrukh Khan चा ‘पठाण’ पुन्हा चर्चेत; ICE Theater मध्ये होणार प्रदर्शित

कोण आहे मानसी नाईकचा पती प्रदीप खरेरा? 

मानसीसा पती प्रदीप खरेरा हा एक बॉक्सर आणि मॉडेल (Mansi Naik Husband Profession)आहे. बरीच वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी सप्तपदी घेण्याचा निर्णय घेतला होता. नेहमीच पतीसोबत फोटो शेअर करणारी मानसी गेल्या काही दिवसांपासून प्रदीपसोबतचे फोटो शेअर करत नसल्याचे काही नेटकऱ्यांच्या लक्षात आले आहे. फक्त मानसी नाही तर तिचा पती प्रदीप देखील नेहमीच मानसीसोबत फोटो शेअर करायचा. (Mansi Naik Husband Is Boxer and Model)आता त्याच्या अकाऊंटवरही मानसीचे फोटो दिसत नाही असे म्हणत काही नेटकऱ्यांनी ती विभक्त झाले का किंवा त्यांच्यात दुरावा आला का असा प्रश्न केला आहे. दरम्यान, त्या दोघांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाही. मानसी आणि प्रदीप 19 जानेवारी 2021 रोजी लग्नबंधनात अडकले होते.  [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *