Headlines

‘…आणि तिला अश्रू अनावर’, ‘डिलिव्हरी बॉय’ पाहताना महिला झाल्या भावूक

[ad_1]

Delivery Boy Movie : लुसिया एंटरटेनमेंट प्रॅाडक्शन निर्मित, सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत ‘डिलिव्हरी बॉय’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून विकेण्डला अनेक ठिकाणी ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी चित्रपटाची टीम चित्रपटगृहांना सध्या भेटही देत आहे. नुकताच अभिनेत्री अंकिता लांडे पाटील हिने चित्रपटगृहाला भेट देऊन प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी अनेकांनी ही कथा भावली असल्याचे सांगितले. काही महिला चित्रपट पाहून अतिशय भावुक झाल्या तर काही महिलांनी यावेळी आपले अनुभव शेअर केले. हे अनुभव शेअर करताना काहींना अश्रुही अनावर झाले. 

महिला प्रेक्षक भावूक 

हा चित्रपट सरोगसीवर भाष्य करणारा आहे. आता हा नाद खुळा भाऊ आणि त्याचा जोडीदार गावातील महिलांना सरोगसीसाठी तयार करतो की आणखी अडचणी मागे लावून घेतो, हे बघताना प्रेक्षकांना धमाल येत आहे. तर या चित्रपटातील ‘तू आई होणार’ या गाण्यानं सगळ्यांची मने जिंकली आहेत. डोहाळे जेवण हा प्रत्येक गर्भवतीसाठी स्वतःचे लाड पुरवून घेण्याचा दिवस असतो. या आठ गरोदर बायकांचा कौतुक सोहळा आणि सेलिब्रेशन करणारे हे गाणे आहे. आईपणाची हळवी भावना या गाण्यातून व्यक्त होत आहे. 

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक  मोहसीन खान म्हणतात, ”घेऊन येतोय एंटरटेनमेंटची डिलिव्हरी, अशी आमच्या चित्रपटाची टॅगलाईनच आहे. यावरून हा चित्रपट किती गंमतीशीर असेल, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. चित्रपट अतिशय मजेशीर आहे. तरीही त्यातून थोडासा सामाजिक प्रबोधन करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.”

निर्माते डेविड नादर म्हणतात, ‘’चित्रपटाचा विषय खूप वेगळा आहे. या विषयाचे गांभीर्य घालवू न देता अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने तो मांडण्यात आला आहे. मला खात्री आहे, हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात नक्कीच यशस्वी होईल.’’

हेही वाचा : पवन कल्याणच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये लावली आग! 12 वर्ष जुन्या चित्रपटाच्या री-रिलीजन केला धिंगाना

हसता हसता पटकन डोळ्यांत पाणी आणणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडतोय. सरोगसीवर भाष्य करणाऱ्या या कथेचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले असून दिग्दर्शक मोहसीन खान यांनी केले आहे. प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप आणि अंकिता लांडे पाटील यांनी उत्तम अभिनय केला असून ‘डिलिव्हरी बॉय’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *