Headlines

72 व्या वर्षी झीनत अमान कोणाला करतायत डेट? व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं केला खुलासा

[ad_1]

Zeenat Aman : दिग्गज अभिनेत्री झीनत अमान या त्यांच्या चाहत्याची यादी अजाही कमी झालेली नाही. त्यांच्या अभिनयाशिवाय त्यांच्या सुंदरतेची देखील स्तुती करण्यात येते. खरंतर 72 व्या वर्षी देखील झीनत अमान या ट्रेंडिंग आणि लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक ठरल्या आहेत. त्यांचं सोशल मीडिया अकाऊंट तर नेहमीच अपडेट आणि क्लासी दिसतं. त्यांनी जेव्हा इन्स्टाग्रामवर डेब्यू केला तेव्हा सगळ्यांना ते पाहून आनंद झाला होता. त्या फक्त त्यांचे आताचे फोटो शेअर करत नाही तर त्यासोबत त्यांचे आधीचे फोटो आणि काही माहित नसलेल्या अनेक गोष्टींविषयी सांगताना दिसतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली असून त्यातून त्यांनी सध्या कोणाला डेट करत आहेत याविषयी माहिती दिली आहे. 

झीनत अमान यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं की त्या कोणाला डेट करत आहेत. त्यात त्यांनी काही आताचे तर काही आधीचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन दिलं की, सध्या मी स्वत: ला डेट करते. मी स्वत: साठी तेच करते जे एक पार्टनर तुमच्यासाठी करतं. जर तुम्हाला कोणती व्यक्ती भेटत नाही आहे जो तुमच्यावर इतकं प्रेम करू शकेल ज्याच्यावर तुमचा हक्क आहे. 

त्यासोबत झीनत अमान यांनी चाहत्यांना डेटिंग टिप्स देखील दिल्या आहेत. त्यातही त्यांनी दिलेल्या या टिप्स खास अशा जोडप्यांसाठी आहेत ज्यांचं कुटुंब हे जात- धर्म, क्लास आणि लिंग यांच्यावरुन त्यांच्या नात्याला नकार देतात. त्या म्हणाल्या, जर तुमचं कुटुंब हे जात, क्लास, धर्म, लिंग अशा अनेक कारणांमुळे विरोध करत असलीत, तर त्यांच्याशी भांडा! पण जर तुमच्या दुसऱ्या कोणत्या कारणामुळे  तुमच्या जोडीदाराला नकार देत असतील, तर त्यांचं ऐका. झीनत यांची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते. झीनत यांनी दिलेल्या या टिप्स योग्य आहेत. 

हेही वाचा : ‘IAS पत्नी करतेय माझा छळ’, नितीश भारद्वाज यांनी मांडली व्यथा

झीनत अमान यांच्याविषयी बोलायचं झालं तर 1985 मध्ये त्यांनी संजय खान यांच्याशी गुपचूप लग्न केलं. संजय खान यांचं त्या आधीच लग्न झालं होतं. तरी त्यांना झीनत फार आवडत होत्या. काही महिने एकमेकांना डेट केल्यानंतर संजय खान आणि झीनत अमान यांनी लग्न केलं. खरंतर, लग्नाच्या काही काळानंतरच त्या दोघांच्या नात्यात दुरावा येऊ लागला होता. त्यानंतर ते विभक्त झाले. त्यांचं विभक्त होण्याचं कारण हे संजय खान यांचा रागिट स्वभाव होता. त्यांनी अनेकदा झीनत अमान यांच्यावर हाथ उगारला होता. ज्यामुळे त्यांच्या डोळ्याला देखील दुखापत झाली होती. तरी देखील त्यांना रुग्णालयात घेऊन न जाता ते तसेच त्यांना सोडून गेले होते. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *