Headlines

लग्न पत्रिका छापल्यानंतर लग्न मोडलं, प्रेमात दोनदा धोका! वयाच्या 63 व्या वर्षी अभिनेत्री करतेय घायाळ

[ad_1]

Sangeeta Bijlani : 90 च्या दशकातील लोकप्रियक अभिनेत्री मुंबईतील एका सोहळ्यात दिसून आली. तिच्या सौंदर्याकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण झालं आहे. या अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये केवळ 10 वर्षंचं काम केलं आहे. तरीदेखील ही चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. क्रिकेटपटूशी लग्न केल्यानंतर तिने ग्लॅमरच्या दुनियेला रामराम केलं. या अभिनेत्री अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्या अभिनयासोबतच तिच्या पर्सनल लाइफमुळे ती कायम चर्चेत राहिली. 

फोटोमध्ये दिसणारी ही अभिनेत्री सर्वात लोकप्रिय आणि अजून अविवाहित असलेल्या सुपरस्टारला एकेकाळी डेट करत होती. त्या दोघांचं हे नातं लग्नापर्यंतही गेलं होतं. मीडिया रिपोर्टसनुसार या जोडप्याच्या लग्नाची पत्रिकाही छापण्यात आली होती. पण हे लग्न काही कारणामुळे तुटलं. आता तरी कळलं का आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत ते, ही आहे सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी. (bollywood salman khan ex girlfriend sangeeta bijlani hot look at age 63 Bedroom video )

सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर संगीताच्या आयुष्यात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनची एन्ट्री झाली. 1985 मध्ये एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान संगीता आणि अझरुद्दीनची भेट झाली. संगीताला पाहून अझरुद्दीन घायाळ झाला. पण त्यावेळी अझरुद्दीनचं लग्न झालं होतं त्याला दोन मुलंही होते. पण त्याने पहिली पत्नी नौरीन हिला घटस्फोटला दिला आणि संगीताशी लग्न केलं. 

तरी आज ती एकटीच…

अझरुद्दीनसोबत लग्न केल्यानंतर 14 वर्षांच्या सुखी जीवनाला ब्रेक लागला. ते दोघे 2010 मध्ये वेगळे झालेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार अझरुद्दीनचे बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टासोबत अफेअर सुरु होते आणि याची भनक संगीताला लागली. त्यामुळे तिने त्याला घटस्फोट दिल्याचं बोलं जातं. 

तरुणींना लाजवेल असं सौंदर्य

आजच्या तरुणींनी आणि अभिनेत्रींना लाजवेल असं सौंदर्य वयाच्या 63 व्या वर्षीही दिसतं आहे. संगीता सोशल मीडियावर सक्रीय असून ती अनेक हॉट व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. 

तिचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर पाहाता ती 63 वर्षांची आहे असं कोणीही म्हणणार नाही.

ती तिच्या फिटनेसवर अतिशय लक्ष देते. योगा करतानाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेत्रीच्या फिटनेसचं सोशल मीडियावर कौतुक होतं आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *