Headlines

५७ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव; ‘वाय’ (Y)ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

[ad_1]

मुंबई : वरळी येथे झालेल्या नेत्रदिपक व शानदार समारंभाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार मनीषा कायंदे,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे आणि सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे आणि मराठी सिने सृष्टीतील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यात कोणत्या सिनेमाने बाजी मारली कोण या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत यावर एक नजर टाकूया.

५७ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे.

उत्कृष्ट कला दिग्दर्शन
(कै. साहेबमामा ऊर्फ फत्तेलाल पारितोषिक)
सुनील निगवेकर व निलेश वाघ.
चित्रपट-आनंदी गोपाळ

उत्कृष्ट छायालेखन 
(कै. पांडुरंग नाईक पारितोषिक) 
करण बी. रावत, 
चित्रपट – पांघरुण. 

उत्कृष्ट संकलन 
आशिष म्हात्रे, श्रीमती अपूर्वा मोतीवाले, 
चित्रपट – बस्ता 

उत्कृष्ट ध्वनीमुद्रण, 
अनुप देव, 
चित्रपट – माईघाट 

उत्कृष्ट ध्वनिसंयोजन,
मंदार कमलापूरकर, 
चित्रपट – त्रिज्या. 

उत्कृष्ट वेशभूषा, 
विक्रम फडणीस,
चित्रपट – स्माईल प्लिज. 

उत्कृष्ट रंगभूषा, 
श्रीमती सानिका गाडगीळ, 
चित्रपट – फत्तेशिकस्त 

उत्कृष्ट बालकलाकार 
आर्यन मेघजी, 
चित्रपट – बाबा. 

सर्वोत्कृष्ट कथा, 
(कै. मधुसूदन कालेलकर पारितोषिक) 
स्व. बा. भ. बोरकर, 
चित्रपट – पांघरुण. 

उत्कृष्ट पटकथा, 
विक्रम फडणीस, इरावती कर्णिक, 
चित्रपट – स्माईल प्लिज 

उत्कृष्ट संवाद, 
(कै. आचार्य अत्रे पारितोषिक) 
इरावती कर्णिक, 
चित्रपट – आनंदी गोपाळ 

उत्कृष्ट गीते 
(कै. ग. दि. माडगूळकर पारितोषिक)
गीत – आभाळासंग मातीचं नांदणं, 
संजय कृष्णाजी पाटील, 
चित्रपट – हिरकणी 

उत्कृष्ट संगीत, 
(कै. अरुण पौडवाल पारितोषिक) 
अमितराज, 
चित्रपट – हिरकणी 

उत्कृष्ट पार्श्वसंगीत 
प्रफुल्ल-स्वप्निल, 
चित्रपट – स्माईल प्लिज 

उत्कृष्ट पार्श्वगायक 
गीत येशील तू, सोनू निगम, 
चित्रपट – मिस यू मिस्टर

उत्कृष्ट पार्श्वगायिका, 
गीत – आभाळसंग मातीचं नांदन, मधुरा कुंभार, 
चित्रपट – हिरकणी

उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक, 
राज्याभिषेक गीत – सुभाष नकाशे, 
चित्रपट – हिरकणी 

सहाय्यक अभिनेत्री
(कै. शांता हुबळीकर व कै. हंसा वाडकर पारितोषिक) 
नंदिता पाटकर, 
चित्रपट – बाबा. 

सहाय्यक अभिनेता, 
(कै. चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिक) 
रोहित फाळके, 
चित्रपट – पांघरुण 

उत्कृष्ट विनोदी अभिनेता, 
(कै. दामूअण्णा मालवणकर पारितोषिक) 
पार्थ भालेराव, 
चित्रपट – बस्ता. 

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता, 
(कै. काशिनाथ घाणेकर पारितोषिक) 
अजित खोब्रागडे, 
चित्रपट – झॉलिवूड. 

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री, 
(कै. रंजना देशमुख पारितोषिक) 
अंकिता लांडे, 
चित्रपट – गर्ल्स

उत्कृष्ट अभिनेत्री, 
(कै. स्मिता पाटील पारितोषिक) 
मृण्मयी देशपांडे, 
चित्रपट – मिस यु मिस्टर 

उत्कृष्ट अभिनेता, 
(कै. शाहू मोडक पारितोषिक) 
दीपक डोब्रियाल, 
चित्रपट – बाबा

प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती, 
१ लाख रुपये पारितोषिक व मानचिन्ह, 
विशबेरी ऑनलाईन सर्विसेस प्रा. लि. 
चित्रपट – झॉलिवूड.  

प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शक, 
१ लाख रुपये व मानचिन्ह, 
अच्युत नारायण, 
चित्रपट – वेगळी वाट. 

व्ही. शांताराम सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट, 
१ लाख ५० हजार रुपये व मानचिन्ह, 
विजेते – आनंदी गोपाळ, 

दत्ता धर्माधिकारी सामाजिक प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक, 
१ लाख रुपये व मानचिन्ह, 
समीर विव्दांस,
चित्रपट – आनंदी गोपाळ

दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट, 
१ लाख ५० हजार रुपये व मानचिन्ह, 
विजेता – ताजमाल, 

अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट दिग्दर्शक, 
१ लाख रुपये व मानचिन्ह, 
नियाज मुजावर 
चित्रपट – ताजमाल. 

मा. विनायक उत्कृष्ट चित्रपट 
२ लाख रुपये व मानचिन्ह. 
विजेते – स्माईल प्लिज, 

राजा ठाकूर उत्कृष्ट दिग्दर्शक  
५० हजार रुपये व मानचिन्ह. 
विक्रम फडणीस, 
चित्रपट – स्माईल प्लिज, 

बाबूराव पेंटर उत्कृष्ट चित्रपट 
३ लाख रुपये व मानचिन्ह. 
 विजेता – मिय यु मिस्टर,

राजा परांजपे उत्कृष्ट दिग्दर्शक 
१ लाख रुपये व मानचिन्ह. 
चित्रपट – मिस यु मिस्टर, 
विजेता – समीर जोशी. 

दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट 
४ लाख रुपये व मानचिन्ह, 
विजेता – वाय (Y), 

भालजी पेंढारकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक 
२ लाख रुपये व मानचिन्ह, 
वाय (Y),
विजेता – अजित वाडीकर[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *