Headlines

3 Idiots Sequel: ऑल इस नॉट वेल! आधी Kareena आता Boman Irani; ‘थ्री इडियट्स’च्या सिक्वेलवरून हायव्होल्टेज ड्रामा

[ad_1]

3 Idiots Sequel: जब लाईफ हो आउट ऑफ कंट्रोल, होठों को करके गोल सीटी बजा के बोल, ऑल इस वेल… या ‘थ्री इडियट्स’ (3 Idiots) चित्रपटातील प्रसिद्ध गाण्याने सर्वांना जगण्याचा धडा दिला. प्रत्येकाच्या करियरसाठी मोलाचा पैलू ठरलेला सिनेमा (3 idiots movie) आजही अनेकजण आवडीने पाहतात. 2009 मध्ये आलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं घर निर्माण केलं. अशातच आता ‘थ्री इडियट्स’चा सिक्वेल (3 Idiots Sequel) येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. (3 Idiots Sequel may come soon Kareena kapoor Boman Irani shared a video clip on official instagram account video viral on social media)

आमिर खान (Aamir Khan), आर. माधवन (R. Madhavan) आणि शर्मन जोशी (Sharman Joshi) या त्रिकुटाने युवा तरुणांना नवी दिशा दिली, असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही. तर करीना कपूर (Kareena Kapoor) आणि बोमन इराणी (Boman Irani) यांनी या चित्रपटात चार चांद लावले होते. अशातच आता या चित्रपटाचा सिक्वेल रिलीज होणार असल्याचं म्हटलं जातंय. थ्री इडियट्सच्या कलाकारांनीच व्हिडिओ (Viral Video) शेअर करत सर्वांची उत्सुकता वाढवलीये.

Kareena Kapoor ला संताप अनावर 

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री करिना कपूरने (Kareena Kapoor On 3 Idiots Sequel) एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात ती थ्री इडियट्सचा सिक्वेल येत असल्याचे संकेत दिले होते, असं दिसतंय. मात्र, खरंच थ्री इडियट्सचा सिक्वेल येणार का? की आणखी काही विषय? असा सवाल उपस्थित केला जात होता. अशातच आता करिना कपूरनंतर आता बोमन इराणी (Boman Irani) यांनी एक व्हिडिओ शेअर करत आमिर, आर माधवन आणि शर्मन जोशीवर निशाणा साधलाय.

आणखी वाचा – 3 Idiots Reunited: 14 वर्षांनंतर रॅन्चो, फरहान आणि राजू एकत्र… ‘तो’ खास फोटो होतोय व्हायरल

काय म्हणाले Boman Irani?

तुम्ही काय करत आहात? तुम्ही व्हायरस (Virus) म्हणजे माझ्याशिवाय थ्री इडियट्सचा विचार कसा करु शकता? असा सवाल बोमन इराणी यांनी विचारला आहे. बरं झालं करीनानं मला सांगितलं. नाही तर मला हे कळालच नसतं. मला वाटलं होतं आपली मैत्री आहे? असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मला हे जावेद जाफरीला (jaaved jaaferi) सांगावं लागेल, असं म्हणत आता जावेद जाफरी यांचा व्हिडिओ देखील समोर आलाय.

पाहा VIDEO

दरम्यान, थ्री इडियट्स चित्रपटाचा सिक्वेल येण्याची शक्यता कमी आहे. एखाद्या जाहिरातीचा हा भाग असल्याचं सांगितलं जातंय. फक्त 55 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 400 कोटींचे कलेक्शन केलं होतं. राजकुमार हिरानी यांनी त्यावेळी या चित्रपटाचा सिक्वेल आणणार असल्याचं बोलून दाखवलं होतं. त्यानंतर आता चर्चेला उधाण आल्याचं पहायला मिळतंय.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *