Headlines

2022 Playlist : ‘उ अंटवा’ ते ‘केसरिया’… 2022 मधल्या ‘या’ TOP Songs नी सर्वानांच वेड लावलं

[ad_1]

Top Hit Indian Songs of 2022: लॉकडाऊननंतर बॉलिवूडमध्ये चित्रपटांना सुरूवातीला चांगलं यश येतं असलं तरी मात्र मागच्या वर्षी आणि यावर्षी बॉलिवूडच्या चित्रपटांना मोठा फटका बसला आहे. त्यातून मोठं मोठं सुपरस्टारही बॉक्स ऑफिसवरील (Bollywood on Box Office) त्यांच्या चित्रपटांच्या यशाला हेरू शकले नाही. परंतु मागच्या वर्षी बॉलिवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फेल गेले असले तरी त्या चित्रपटातील त्यांनी गाणी सुपरहिट ठरली आहेत. त्यातून बॉलिवूडपेक्षा दााक्षिणात्त्य चित्रपटांना (South Indian Movie Songs) यावर्षी कोट्यवधी रूपयांची कमाई केली आहे. अक्षय कुमार आणि आमिर खानच्या चित्रपटांपेक्षा लोकांना आरआरआर (RRR), पुष्पा (Pushpa), केजीएफ, पीएस – 1 आणि कांतारासारखे (Kantara) चित्रपट आवडले आहेत. त्यामुळे या चित्रपटांची गाणीही पुष्कळ प्रमाणात लोकप्रिय ठरली आहेत. यावर्षी याच सगळ्या चित्रपटांची चर्चा होती. युट्यूबवरही टॉप गाणी ही दाक्षिणात्त्यच होती परंतु त्याच्याही जोडीनं हिंदी गाण्यांनीही यावेळी प्रेक्षकांची मनं जिंकली. मनिके आणि केसरिया सारखी गाणी यावेळी हिट लिस्टवर होती. (south hit songs kesariya to saami saami pushpa india hindi songs bollywood)

तुमच्या प्लेलिस्टमध्येही होती का ही टॉप 10 गाणी? 

1. आरआरआर मधील ‘नाटू नाटू’ (Naatu Naatu) – यावर्षी सगळ्यात हीट गाणं ठरलं ते म्हणजे ‘नाटू नाटू’. या गाण्याचे रिल्स सगळीकडे व्हायरल होऊ लागले होते. या गाण्याचा सोशल मीडियावर एकच बोलबोला होता. या गाण्याची जादू सगळीकडेच पसरली होती.

2. पुष्पामधील ‘सामे सामे’, ‘श्रीवल्ली’ आणि ‘उ आंतवा’ (Pushpa) – त्यानंतर मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात हिट झालेल्या गाण्यांपैंकी एक गाणं होतं ते म्हणजे पुष्पा या चित्रपटातलं ‘उ आंतवा’. या गाण्याची क्रेझ अख्खा जगभर पसरली होती. या गाण्यानं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. त्याचसोबत याचं चित्रपटातील ‘सामे सामे’ हे गाणंही पुष्कळ हिट ठरंल. युट्युबवरही या गाण्यानं अनेक रेकॉर्ड्स मोडले. 2022 चं संपुर्ण वर्ष हे गाणं गाजलं आहे. त्याचबरोबर ‘श्रीवल्ली’ या गाण्यानंही यावर्षी धुमाकूळ घातला होता. 

3. भुवन बड्याकर ‘कच्चा बदाम‘ (Kaccha Badam) – चित्रपटातील गाणी लोकप्रिय होतात त्याप्रमाणे म्युझिक अल्बमही लोकप्रिय होतात. सोशल मीडियावर या वर्षी सगळ्यात जास्त क्रेझ होती ती भुवन बड्याकरनं गायलेल्या कच्चा बदाम या गाण्याची. या गाण्याचेही अनेक रिल्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे या गाण्याला तरूणांसोबतच प्रौढवर्गानंही पसंती दर्शवली होती. 

4. ब्रम्हास्त्रमधील ‘केसरिया’ (Kesariya)- आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या ब्रम्हास्त्र या चित्रपटातील केसरिया हे गाणं प्रचंड गाजलं. अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये हे गाणं होतंच. या गाण्याला अरिजत सिंगनं आवाज दिला आहे. 

5. थॅंक गॉडमधील ‘मनिके’ (Manike) – अजय देवगण आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचा थॅंक गॉड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा गाजला नाही परंतु या चित्रपटातील ‘मनिके’ हे गाणं प्रचंड प्रमाणात गाजलं. हे गाणी श्रीलंकन गायिका योहानी हिनं गायलं आहे. 

6. ‘ले ले आई कोकोकोला’ – ले ले आई कोकोकोला हे एक भोजपूरी गाणं आहे जे युट्यूबवर पॉप्यूलर ठरलं आहे. 

7. बिस्ट या चित्रपटातील गाणं ‘अरबी कुथू’ – या वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट ‘बिस्ट’ या चित्रपटातील अरबी कुथू हे गाणं सर्वात जास्त लोकप्रिय ठरलं आहे. हा दाक्षिणात्त्य चित्रपट असून यात सुपरस्टार विजय आणि पुजा हेगडे यांच्या प्रमुख भुमिका आहेत. 

8. ‘पसुरी’ – कोक स्टुडिओच पसुरी हे गाणंही युट्यूबवर हिट ठरलं आहे. 

9. ‘नथुनिया’ – नथुनिया हे भोजपूरी गाणंही यावेळी सुपरहिट ठरलं आहे. 

10. पठाणमधील ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) – सध्या या गाण्याची सर्वात जास्त चर्चा आहे. पठाण चित्रपटातील हे गाणं सध्या वादात अडकलं आहे. परंतु या गाण्याला युट्यूबवर 100M व्ह्यूस आले आहे. त्यामुळे सध्या हे गाणं हिट ठरलं आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *