Headlines

सुरमई, कोळंबी फ्राय; माहीम समुद्रकिनाऱ्याजवळ मराठी अभिनेत्रीने केले जेवण, म्हणाली ‘कोणीही…’

[ad_1]

Manava Naik Mahim Sea Food Plaza : मुंबई महापालिकेने सुरु केलेल्या ‘सी फूड प्लाझा’ या उपक्रमाला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मुंबईतील पहिलेवहिले सी फूड प्लाझा माहीम कोळीवाड्यातील समुद्र किनारी सुरू करण्यात आले आहे. यात समुद्रकिनाऱ्याजवळ बसून खास कोळी पदार्थांचा आस्वाद मुंबईकरांना घेता येत आहे. मासे खाणाऱ्या खवय्यांसाठी ही मोठी पर्वणी असल्याचे म्हटलं जात आहे. आता एका मराठी अभिनेत्रीने माहीम कोळीवाड्यातील सी फूड प्लाझामधील चव चाखली. याचा एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे. 

मराठी अभिनेत्री मनवा नाईक ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच मनवाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती माहीम कोळीवाड्यातील सी फूड प्लाझाबद्दल सांगताना दिसत आहे. याला कॅप्शन देताना तिने या ठिकाणाचा पत्ता दिला आहे. सी फूड जॉईंट्स, माहिम कॉजवे, सागरी पोलीस स्टेशनजवळ असे मनवाने म्हटले आहे. 

मनवा नाईकची झाली ‘अशी’ अवस्था

त्यासोबतच ती म्हणाली, मुंबईत माहिम कॉजेवला नेहमी एक जत्रा भरते, जर तुम्ही माहिम कॉजवेला आलात आणि त्या गल्लीतून आत गेलात तर आपल्याला असं वाटतं की आपण समुद्रावर पोहोचणार, तेव्हा उजव्या बाजूला वळायचं आणि तिथे मोठ्या प्रमाणात स्टॉल लागलेले आहेत. या ठिकाणी अतिशय ताजे मासे तुम्हाला इथे खायला मिळतात. ही एकदम अशी खोपच्यातील जागा आहे. या माशांची क्वॉलिटीही फारच उत्तम आहे. इथे नक्की या, असे मनवाने म्हटले आहे. 

त्यामुळे बाहेरचे फॅन्सी फिश पाईंट विसरा आणि खरंच इथे या. मला कोणीही ब्रँडिंग करायला सांगितलेले नाही. मला खरंच इथलं जेवण आवडलं आहे. या ठिकाणी सुरमई फ्राय, पापलेट फ्राय, कोळंबी फ्राय, बोंबील फ्राय, झवळा पॅटिस, बोंबील पॅटिस हे सर्व मिळतं, असेही मनवाने सांगितले आहे. यानंतर या व्हिडीओच्या शेवटी मनवा ही सोफ्यावरच झोपल्याचे दिसत आहे. या फोटोवर तिने ओव्हर इटिंग अँड आऊट असे म्हटले आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर असंख्य चाहते कमेंट करताना दिसत आहे. 

दरम्यान मनवा नाईकने अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती अशी ओळख  निर्माण केली आहे. अभिनेते डॉ. अमोल कोल्हेंच्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटातही ती झळकली होती. तिने छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नीची सोयराबाई मोहिते ही भूमिका साकारली होती. सध्या ती एक उत्तम निर्माती बनली आहे. तिच्या प्रॉडक्शन हाऊसच्या अनेक मालिका गाजताना दिसत आहेत.  [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *